Oral health checkup and treatment camp for children
बालदंतरोगशास्त्र विभाग, शासकीय दंत महाविद्यालय व रूग्णालय मुंबई व स्वयम् चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत दि. ६/०२/२०२५ रोजी मनोर तालुका व जि. पालघर येथे आदिवासी बहुल मुलांच्या शाळेत दंत तपासणी व दंतोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले.
डॉ. डिंपल पाडावे मॅडम, प्राध्यापक व विभागप्रमुख बालदंतरोगशास्त्र तसेच डॉ सोनाली कदम, प्राध्यापक (शै) मुखरोग निदान शाश्र यांच्या नेतृत्वाखाली संस्थेतील ३ अध्यापक, ६ पदव्युत्तर विद्यार्थी व १ आंतरवासिता असे १२ जणांचे पथक सदर शिबिरासाठी उपस्थित राहिले.
३५० विद्यार्थ्यांची दंत तपासणी करून साधारणत: ७०० दातांवर SDF उपचार केले गेले. सर्व मुलांना खेळताना होणाऱ्या ईजा टाळण्यासाठी समुपदेशन केले.
सर्व शाळकरी मुलांना ब्रशिंगची योग्य पद्धत देखील शिकविण्यात आली.
तसेच स्वयम् चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून सर्व शाळकरी मुलांना टूथब्रश, टूथ पेस्ट, शालोपयोगी वस्तूंचे वाटप केले गेले.
सदर कार्यक्रमासाठी सहसंचालक डॉ.विवेक पाखमोडे यांनी प्रेरणा दिली. तसेच अधिष्ठाता शासकीय दंत महाविद्यालय व रूगणालय मुंबई – डॉ.वसुंधरा भड पाटील मॅडम यांनी मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.