शासकिय दंत महाविद्यालय व रुग्णालय, मुंबई आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालय, मुंबई यांचे संयुक्त हिरकणी कक्ष संस्थेच्या तळमजल्यावर प्रस्थापित करण्यात आले. सदर हिरकणी कक्षाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आले असून त्यासाठी मा आयुक्त श्री राजीव निवतकर सर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
आज दिनांक ३/४/२०२४ रोजी मा अधिष्ठाता डॉ वसुंधरा भड पाटील मॅडम यांच्या शुभहस्ते हिरकणी कक्षाचे उद्गघाटन करण्यात आले. बालदंतरोगशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ डिंपल पाडावे मॅडम यांनी सदर कामाचा यशस्वीपणे पाठपुरावा केला.